हल्ली तुझी कविता- कविता

९० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात 'कविकट्टा' या व्यासपीठावर सादर करण्यासाठी निवड झालेली ही कविता.

हल्ली तुझी कविता

हल्ली तुझी कविता
पहिल्यासारखी बोलत नाही
माणसातला माणूस बनून
कागदावर उमटत नाही

हल्ली तुझी कविता
तुटक भावना व्यक्त करत नाही
मनात उसळणारी घुसमट
तू काही केल्यातरी सांगत नाही.

हल्ली तुझी कविता
मुक्तपणे वावरत नाही
नियमांच्या बंधनात अडकून
आशय मात्र मांडत नाही.

हल्ली तुझी कविता
नातेसंबंध मानत नाही
म्हणून आयुष्याच्या कठीणप्रसंगी
तुझ्या कोणीच सोबत नाही

हल्ली तुझी कविता
वास्तवाशी तोलत नाही.
क्रांतीची स्वप्न दाखवणाऱ्या
शब्दांमध्ये बोलत नाही.

हल्ली तुझी कविता
फसवणूक करून हसवत नाही.
हळव्या भावनांशी नातं तोडून
नाटकी विनोद करत नाही.

हल्ली तुझी कविता
पारितोषिक स्वीकारत नाही.
कारण कल्पनारम्य कवितांमध्ये
वास्तववादाला स्थान मिळत नाही.

हल्ली तुझी कविता
तुझं नाव गाजवत नाही.
कारण 'कवी' म्हणून आता
तुझी कविताच ओळखत नाही.

- प्रवीण जावळे
मो.क्र. - 08286644504

Comments

Popular posts from this blog

सभ्य बलात्कार

भणंग रस्ते - कविता

नास्तिकाचं घर