प्रेमात पडल्याचं लक्षण-कविता

प्रेमात पडल्याचं लक्षण

          ठीक २ वर्षे झाली आज. १२ वीची ओरल एग्जाम देऊन आलो होतो. गेल्या काही दिवसांपासून कसल्याचं गोष्टीवर लक्ष लागत नव्हतं. नक्की काय होतंय हे माझं मलाच कळत नव्हतं. मनातून अगदी भारावलेला होतो. आनंदी. आनंद कसला ते काही कळलं नव्हतं. स्वतःच स्वतःवर हसायचो, गाणं गुनगुनायचो, झोपेतून अचानक जाग यायची अन् झोप लागायचीच नाही. या गोष्टी का होत आहेत याचा सुगावा काही लागत नव्हता. एकंदरित मन थाऱ्यावर नव्हतं माझं.

या भावनेच्या भरात शांत होण्यासाठी चिमणी गार्डनला गेलो. अचानक काही वेळाने हात बॅगेकडे झुकू लागले. बॅगेतून पेन अन् वही काढली. वहीचं कोरं पान दिसताच मनातलं अकथ प्रतिबिंब पेनातल्या शाईतून शब्दांद्वारे उमटू लागलं. चिमणी गार्डन दुपारची रम्य शांतताही सोबतिला होतीच. अश्या या सगळ्या प्रवाहातून, शब्दांची जुळवाजुळव होऊन अखेर कविता तयार झाली. ही आयुष्यातली पहिली कविता.

प्रेमात पडल्याचं लक्षण

तू कुणाच्यातरी प्रेमात पडण्याचं स्टेट्स टाकणं,
आणि ते मी नकळत बघितल्यावर.
त्याचं प्रत्युत्तर म्हणून, नवीन स्टेट्स टाकणं
हे...प्रेमात पडल्याचं लक्षण तर नाही ना?

माझ्या मनातल्या भावना उमटिवण्यासाठी,
रात्री उशिरा जागून कविता तयार करून
तुला व्हाट्स अपवर पाठवणं,
हे...प्रेमात पडल्याचं लक्षण तर नाही ना?

माझी कविता वाचून तुझा होकार ऐकण्यासाठी,
सकाळी लवकर उठून
तुझ्या रिप्लायची वाट पाहणं
कविता अजुन अनरीड् असल्याने
माझं निराश होणं,
हे...प्रेमात पडल्याच् लक्षण तर नाही ना?

तू कविता रीड केल्यावर
तुझ्या वॉलवर टायपिंग पाहण्यासाठी
माझं मन आतुर होणं
अन् तू रिप्लाय देऊन होकार कळवशील
या आशेवर राहणं,
हे प्रेमात पडल्याच लक्षण नाही ना?

मी पाठवलेल्या प्रत्येक कवितेला
तुझं कौतुक असतं
पण आज या कवितेला तू दुर्लक्ष केलस.
तू दुर्लक्षित केलं म्हणून
मी अस्वस्थ होणं
हे...प्रेमात पडल्याच् लक्षण तर नाही न?

दुर्लक्षित कवितेला प्रतिक्रिया मिळविण्यासाठी,
अभ्यास बाजूला सारून मी वेळ काढणं
अन् ही कविता तयार करून पाठवणं
हे...प्रेमात पडल्याचं लक्षण नाही ना?

कदाचित या कवितेला तरी साद घालशील!
आणि तुझ्या मनात काय आहे ते मला कळवशील...

- प्रवीण जावळे.
- ०५/०२/२०१५
वेळ- १५.४३

Comments

Popular posts from this blog

सभ्य बलात्कार

भणंग रस्ते - कविता

नास्तिकाचं घर