Posts

Showing posts from February, 2017

विजय असो - कविता

विssजय असो. साहेबांनी त्याला हातात भगवा झेंडा दिला अन् सांगितले ओरडायला 'विजय असो' तो कंठापासून ते बेंबीच्या देठापर्यंत आकसून ओरडला ''विsssजय असो'' त्याचा आजचा पोटापाण्याचा ...

काय लिहावं आणि काय लिहू नये. - कविता

काय लिहावं आणि काय लिहू नये. खरं बोलत असलो तरीही तुम्ही मात्र रागवू नका, काय लिहावं अन् काय लिहू नये हे मात्र तुम्ही सांगू नका. साहित्य समाजाचा आरसा सत्य कधी लपून राहील का? ...

उणीव - कविता

उणीव रंगमंचावरील पहिलीच कामगिरी मनात घबराट,जरासं दडपण पण,मन स्थिर करत भूमिकेवर लक्ष देऊ लागलो. प्रयोग सुरु होण्यापूर्वी पूर्वतयारीत एकटाच मग्न झालो. कर्टनचा पुकार,प्...

ओळख

बऱ्याच वेळा असं होतं की, काही व्यक्ती एका भेटीत ओळखीच्या वाटतात तर काही व्यक्ती कित्येक भेटीनंतरही अनोळखी.

हल्ली तुझी कविता- कविता

९० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात 'कविकट्टा' या व्यासपीठावर सादर करण्यासाठी निवड झालेली ही कविता. हल्ली तुझी कविता हल्ली तुझी कविता पहिल्यासारखी बोलत नाही मा...

राग

आपण ज्यांच्यावर रागवतो ती आपली हक्काचीच माणसं असतात, दूसरे कोणी नसतात. एखाद्या गोष्टीचा राग येणं म्हणजे एकाप्रकारे आपुलकिने काळजी घेण्यासारखंच आहे. -प्रवीण जावळे.

लोकशाही आणि प्रसारमाध्यमे

भारतात लोकशाही टिकवून ठेवायची असेल तर प्रसारमाध्यमे ही प्रबळ (भूमिकेबाबत) असणं गरजेचं आहे. कारण प्रसारमाध्यमे लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहेत असं आपण मानतो, परंतु एकंदर...

ती सध्या काय करते. कथा

ती सध्या काय करते..?           वाचन करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला होता म्हणून म्हटलं आज पुस्तक वाचावं. तसं पाहायला गेलं तर कोणत्याही गोष्टीसाठी वेळ हा मिळत नसतो तर वेळ काढावा लागतो. तर आज वाचनासाठी वेळ काढला. नेहमीची माझी आवडती, हक्काची जागा...चिमणी उद्यान. या जागेवर जाऊन वाचन करण्याचा आनंद वेगळाच आहे व अनुभवही. या उद्यानाचं खरं नाव 'स्वतंत्र सैनिक उद्यान' असलं तरी ओळख मात्र 'चिमणी उद्यान' या नावानेच होते. या उद्यानाच्या मध्यवर्ती भागात चिमणीच्या आकाराची प्रतिकृती आहे आणि या उद्यानाची कित्येक वर्षापासून निगा राखणारे काका...त्यांनी एकदा बोलता-बोलता सांगितलं की, काही वर्षांपूर्वी या उद्यानात चिमण्या यायच्या. त्यांचा किलबिलाट फार चालायचा इथे. यामुळे या उद्यानाला 'चिमणी उद्यान' नाव पडलं किंबहुना लोकप्रणित पध्दतीने मिळालं. तसेच माझ्या मते 'स्वतंत्र सैनिक उद्यान' खरं नाव देण्यास काही सामाजिक व राजकीय कारणं असतील.           पुस्तक वाचताना त्यात रूळलो तर आजुबाजूला काय होतय हे लवकर लक्षात येत नाही. त...

बोलूया जरा पुस्तकांविषयी.

कोसलन (कादंबरी) - शंकर पाटील कॉलेजला सुट्टी लागल्याने मोकळा वेळ वाचनासाठी देता यावा यासाठी कॉलेज लायब्रेरी गाठली आणि शंकर पाटील यांची 'कोसलन' नावाची मराठी कादंबरी वाचण्...

प्रेमात पडल्याचं लक्षण-कविता

प्रेमात पडल्याचं लक्षण           ठीक २ वर्षे झाली आज. १२ वीची ओरल एग्जाम देऊन आलो होतो. गेल्या काही दिवसांपासून कसल्याचं गोष्टीवर लक्ष लागत नव्हतं. नक्की काय होतंय हे माझ...