Posts

Showing posts from 2019

कमिटमेंट

          तो मला माणूस म्हणून भावला होता. खरंच प्रेमात जात,पंथ,धर्म,वंश,रंग हे सगळे भेद त्याला अमान्य होते. आणि हे मला त्यानेच पटवून दिलं होतं. पटवून दिल्यानंतर "मी बोलतोय हे सगळं अगदी बरोबर असेल असं नाही तुझ्या अंतर्मनाला पटलं तर नक्की विचार कर." म्हणजे सगळं सांगून झालं तरी माझं म्हणणं म्हणजे सगळं खरं आहे हे ठणकावून न सांगता उदारमताने विचार व्यक्त करणं फार भावलं होतं. तसेच वरून इतका रुक्ष वाटणारा आणि जहाल विचार करणारा हा इतका रोमँटिक असेल याची कल्पनाच नव्हती. कवितांची डायरी त्याला न सांगता चाळली तर त्याच्या सगळ्या कविता या त्याच्याच आहेत का हा प्रश्न पडला? कवितेतली त्याची प्रियसी अन् तिच्याभोवती घुटमळणाऱ्या याच्या रोमॅंटिसीजमच्या काव्यपंती हे विशेष लक्षण. याच इतकं हळवं मन असू शकेल असं वाटलं नव्हतं. हा नसला तरी याच्यातल्या कवीचं मन हळवं आहे हे नक्की. "फार रोमॅंटिक आहेस रे तू तर!" त्याची खोड काढत म्हटलं.         "म्हणजे?" "ये सब कविताए कह रही है जनाब." त्याची डायरी त्याच्या हाती ठेवत म्हटलं.  ...

तिची इच्छा _ डायरी नोट

शेवटचं बोलणं होतं आमचं. यानंतर पुन्हा कधी भेट होईल(?) सांगता येत नाही. इतक्या दिवसाचे सोबती होतो आम्ही पण खरंच आम्ही एकमेकांचे सोबती होतो का? हा प्रश्न आज स्पष्ट झाला होता. म...

नास्तिकाचं घर

नास्तिकाचं घर हळुवारपणे त्याने तिच्या डोळ्यांवर हात ठेवला अन् दोघांनी घराचा उंबरठा ओलांडला तिच्या डोळ्यांवरील हात बाजूला बाजूला झाल्यावर तिला दिसला प्रशस्त हॉल, आ...

एकतर्फी प्रेम

एकतर्फी प्रेम तो आहे तसाच आहे अजूनही. इतक्या वर्षात बदल अपेक्षित होता पण नाही तसाच आहे तो जसा  पहिल्यांदा मला जाणवला होता. इतरांना स्वतःपेक्षा जास्त महत्त्व देणारा; काम...