नास्तिकाचं घर

नास्तिकाचं घर

हळुवारपणे त्याने तिच्या
डोळ्यांवर हात ठेवला
अन्
दोघांनी घराचा उंबरठा ओलांडला

तिच्या डोळ्यांवरील
हात बाजूला बाजूला झाल्यावर
तिला दिसला प्रशस्त हॉल,
आलिशान फर्निचर,
तिने स्वप्नात रंगवलेले
गडद हिरवळ डोंगराशी
संवाद साधता येईल अशी खिडकी,
घरात सर्वत्र इटालियन टाईल्स

खांद्याना पकडून वळसा घेऊन त्याने दाखवले
दिपलाईट डबल बेडशीट बेडरूम,
ग्रँड लक्झरी प्रशस्त किचन

नंतर त्याने पुन्हा डोळे झाकले
अन् किचनलगत तिच्या
खांद्यावर तिच्या हनुवटी ठेऊन
कानात सप्राईज म्हटलं.
मधमाशीच्या पोळ्यातील मधाप्रमाणे
त्याच्या बोलण्यात गोडवा होता.

हात बाजूला सारून
डोळे उघडायला सांगितल्यावर
तिला दिसलं 'देवघर'
तेव्हा
वेधक नजर तिची अडखळली होती
तिने त्याच्याकडे वळून म्हटलं
तू तर नास्तिक न?

- प्रवीण जावळे.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

सभ्य बलात्कार

भणंग रस्ते - कविता