Posts

अस्वस्थ कोण?

        काय झालं असेल काय माहित त्याला? तब्येतीने म्हणावा तर तो उत्तम शरीरयष्टी असलेला. इस्त्री केलेले फॉर्मल कपडे, खांद्यावर एका हाताने पकडलेली बॅग, टोकदार नाक, बारीक पण ...

मर्द को कभी दर्द नही होता।

'मर्द को कभी दर्द नहीं होता।'        'मर्द' सिनेमा आल्यापासून हा संवाद प्रत्येकाच्या डोक्यात इतका घट्ट बसलाय कि, तो आता बाहेर पडणं किंवा विसरणं अशक्य आहे. हा संवाद पुरुषांच्या तोंडातून सर्वाधिक ऐकायला मिळतो. परंतु हा सिनेमा बाजूला ठेवून याचा विचार केला तर. खरंच मर्द म्हणजे पुरुष यांना वेदना होत नाही का? वेदना काय फक्त स्त्रियांना होतात असं आहे का? पुरुषांचं शरीर दगडापासून किंवा धातूपासून बनलेलं असतं का? याचा सारासार कल्पकतेच्या पलीकडे जाऊन कुशल बुद्धीने विचार केला तर याचं उत्तर 'नाही' असं आहे. आता मर्द (पुरूष) आणि स्त्री म्हणजे कोण? किंवा आपल्याला स्त्री-पुरुष अशी ओळख कशी मिळते?          जन्म झाल्यावर आपण मानव प्राणी म्हणून जन्माला येतो. त्यावेळी आपल्याला 'आपण स्त्री आहोत की पुरुष.' हे बिलकुल कळत नसतं. आपल्याला निसर्गतः मिळालेल्या रचनेवरून स्त्रीत्वं, पुरुषत्वं बहाल केलं जातं. त्यानंतर तशीच कपडे घातली जातात मग त्याच प्रकारची कपडे कायमस्वरूपी घालावी लागतात. हे झालं दिसण्यावरून. आणि मानसिकरित्या आपल्यावर जी जडणघ...

कारकून आणि पुरस्कार

कारकून आणि पुरस्कार एका शहरातील दोन लेखक अचानक भेटतात. आजपर्यंत त्यांनी लिहिलेलं साहित्य, वाचलेली पुस्तके, आवडते लेखक, यांवर त्या दोघांमध्ये भरपूर चर्चा होते. एक लेखक ज...

चू साला

चू साला . चहाच्या घोट घेत जुन्या मित्राचा हालहवाल जाणून घेण्यासाठी मी त्याला विचारलं "कसा आहेस?" सिगरेटच्या धुराची रिंग बनवतानाचा पॉज घेत तो म्हणाला. "एकदम मस्त भावा.'' पुढ...

सभ्य बलात्कार

सभ्य बलात्कार मध्यरात्री पेटलेल्या सिगारेटच्या वासाने 'तिची' साखरझोप भंग झाली. 'त्याने' हातांवर-हात ठेवले, ओठांना कुस्करून जवळ घट्ट खेचून त्याने शरीरावर झडप घालती अन् ...

निघून जाण्याआधी...

निघून जाण्याआधी.. .          सौरभशी बोलावसं वाटतं. पण त्याने अबोला धरला आहे. जेव्हा मी त्याच्याशी बोलायला जाते तेव्हा मात्र तो दुर्लक्ष करून माझ्यापासून दूर निघून जातो. त्याच्या अश्या वागण्याचा मला त्रास होतोय हे त्याला का जाणवत नाही? अगोदर तर मला भेटण्यासाठी नेहमी उत्सुक असायचा. माझ्यासोबत कॉलेज कॅन्टीनमध्ये मनभरून गप्पा मारत बसायचा. आम्ही अनेक गोष्टी एकमेकांशी शेअर करायचो. खूप काही बोलायचो; पण आता त्याचं मला टाळणं, माझ्यापासून दूर जाणं, माझ्या मेसेजला रिप्लाय न देणं, कॉल अटेंड न करणं, या सगळ्याचा मला फार त्रास होतोय याची त्याला काहीच जाणीव नाही. हे असं का?            मी त्याच्या वाढदिवसाला जे वागले ते बरोबर होतं का? हे माझं मलाच कळत नाहीये. माझ्या सान्निध्यात असलेल्या लोकांच्या भावना मला खरच कळतात का? मी त्यांना समजून घेऊ शकते का? हे प्रश्न आता माझं मन खात आहेत. कधी कधी फार अपराधी वाटतं मला.          सौरभ माझा अत्यंत जिवलग मित्र. आमच्या दोघांच्या मैत्रीत कसलीच पोकळी राहीलेली नव्हती. विश्वासान...

प्रेमाची ओढ

Image
" प्रेमाची ओढ " आज मन मोकळ वाटतंय. तुझ्यासोबत बोलण्याने, तुझ्याशी संवाद साधल्याने, माझ्या मनाची तळमळ तू ऐकून घेतलीस. माझ्या दुखांच्या वाटेत वाटेकरी बनलीस. मला सहानभूती देत होतीस. पाहिल्यांदा तुला भेटल्यावर, तुझ्या चेहऱ्यावर दुःखाचं सावट होत. ते नक्की का आले आहे? हे मी समझू शकलो नाही. ते जाणून घेण्याचा प्रयत्नही केला. पण,अजुन तुझ्या दुःखांच्या जखमा ताज्या होत राहिल्या. तुझ्या दुखांत सहभागी होण्याचा प्रयत्न केला. परंतु तो निष्फळ ठरू लागला. तुझ्या दुःखांत. सहभागी होता आले नाही तर काय झालं? पण तुला असं दुःखांत ठेवणे माझ्या मनाला न पटणारे होते. म तुला हसवू लागलो. त्यावेळी माझं दुःख तुझ्याजवळ अव्यक्त करू लागलो. तू पण प्रतिसाद देत होतीस. जरा का होईना. चेहऱ्यावर स्मित हास्य तरी दर्शवित होतीस. तू जेव्हा मनमोकळपणे हसू लागली. तेव्हा माझ्या मनाच्या समाधानाचं मापन करू शकत नव्हतो. नंतर सुरु झाल्या आपल्या इतर गप्पा-टप्पा. निखळ मनाप्रमाणे तू बोलू लागली. माझ्या नजरेला नजर देऊ लागली. सोबत फ़ास्टफ़ूडची मेजवानी होतीस. त्या तू मला काहीतरी खा न. असा आग्...