कारकून आणि पुरस्कार

कारकून आणि पुरस्कार

एका शहरातील दोन लेखक अचानक भेटतात. आजपर्यंत त्यांनी लिहिलेलं साहित्य, वाचलेली पुस्तके, आवडते लेखक, यांवर त्या दोघांमध्ये भरपूर चर्चा होते.

एक लेखक ज्याचा अनेक पुरस्कारांनी गौरव झालेला असतो. अनेक पुस्तके प्रकाशित झालेली असतात, काही पुस्तकांचा खप इतका कि अनेकवेळा त्या लेखकाला त्या पुस्तकांच्या नवीन आवृत्त्या काढाव्या लागल्या.

अन् दुसरा लेखक ज्याचं इतकं लिखाण नाही, मोजकीच पुस्तके प्रकाशित झालेली. पुरस्कार वगैरे अजून काही त्याला मिळाला नाही.

दोघांची चर्चा रंगत असताना दोघे 'लेखक म्हणजे काय? अर्थात लेखक कुणाला म्हणावे?' या मुद्दयावर चर्चा सुरु झाली.

पहिल्या लेखकाने अगदी एका वाक्यात आणि ठराविक शब्दात 'लेखक' या शब्दाची व्याखा सांगितली.

तो म्हणाला ''जो लिहित असतो तो लेखक''

दुसरा अगदी शांतपणे म्हणाला.

"ज्याला 'कारकून' आणि 'पुरस्कार' याचा अर्थ कळाला तो 'लेखक' असं मी तर मानतो."

-प्रवीण जावळे.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

सभ्य बलात्कार

भणंग रस्ते - कविता

नास्तिकाचं घर