अस्वस्थ कोण?

        काय झालं असेल काय माहित त्याला? तब्येतीने म्हणावा तर तो उत्तम शरीरयष्टी असलेला. इस्त्री केलेले फॉर्मल कपडे, खांद्यावर एका हाताने पकडलेली बॅग, टोकदार नाक, बारीक पण बोलक्या डोळ्याला शोभून दिसेल असा हाफ फ्रेम चष्मा या एकंदरीत पेहरावरून  हा शिक्षित अन् चांगल्या पगाराची नोकरी करणारा असावा. परंतु हा भररस्त्यावर मांडी घालून ढसाढसा रडत होता. बाजूला बसस्टॉपवर बसची वाट पाहणारी मंडळी आपापल्या बसची वाट पाहत होती. यांच्याकडे लक्ष जाण्यास कारण म्हणजे याचा रडताना येणारा आकांत. "नक्की काय झालं असेल? का असं रडतोय हा माणूस?" मला पडलेला हा प्रश्न इतरांनाहि नक्कीच पडला असेल. पण त्याला काय होतंय हे कोणीच विचारत नव्हतं.

     बॅगेत असलेली पाण्याची बॉटल काढून त्याला पाणी देत विचारावं; असा बेत ठरलेला असताना समोरून येणाऱ्या बसकडे नजर गेली. त्याला त्याच स्थितीत सोडून इतरांसोबत मीदेखील बसच्या दिशेने निघालो.

       त्याच्यापासून दूर गेलो तरीही गेलो असलो तरी त्याच्या रडवेला चेहरा दिवसभर आठवत होता. बस न पकडता त्याला विचारलं असतं तर बरं झालं असतं. रडणं त्याचं थांबवू शकलो असतो का? हे माहित नाही पण त्याच्या रडवेला चेहरा आठवून अस्वस्थ तरी झालो नसतो.

Comments

Popular posts from this blog

सभ्य बलात्कार

भणंग रस्ते - कविता

नास्तिकाचं घर