प्रेमाची ओढ
" प्रेमाची ओढ "
आज मन मोकळ वाटतंय.
तुझ्यासोबत बोलण्याने,
तुझ्याशी संवाद साधल्याने,
माझ्या मनाची तळमळ
तू ऐकून घेतलीस.
माझ्या दुखांच्या वाटेत
वाटेकरी बनलीस.
मला सहानभूती देत होतीस.
पाहिल्यांदा तुला भेटल्यावर,
तुझ्या चेहऱ्यावर दुःखाचं सावट होत.
ते नक्की का आले आहे?
हे मी समझू शकलो नाही.
ते जाणून घेण्याचा प्रयत्नही केला.
पण,अजुन तुझ्या दुःखांच्या जखमा
ताज्या होत राहिल्या.
तुझ्या दुखांत सहभागी होण्याचा प्रयत्न केला.
परंतु तो निष्फळ ठरू लागला.
तुझ्या दुःखांत.
सहभागी होता आले नाही तर काय झालं?
पण तुला असं दुःखांत ठेवणे
माझ्या मनाला न पटणारे होते.
म तुला हसवू लागलो.
त्यावेळी माझं दुःख
तुझ्याजवळ अव्यक्त करू लागलो.
तू पण प्रतिसाद देत होतीस.
जरा का होईना.
चेहऱ्यावर स्मित हास्य तरी दर्शवित होतीस.
तू जेव्हा मनमोकळपणे हसू लागली.
तेव्हा माझ्या मनाच्या समाधानाचं
मापन करू शकत नव्हतो.
नंतर सुरु झाल्या आपल्या इतर गप्पा-टप्पा.
निखळ मनाप्रमाणे तू बोलू लागली.
माझ्या नजरेला नजर देऊ लागली.
सोबत फ़ास्टफ़ूडची मेजवानी होतीस.
त्या तू मला काहीतरी खा न.
असा आग्रह करू लागली.
तुला एक खर सांगू का?
तुझ्यासोबत असतो न.
त्यावेळी माझ्या शब्दांना वाचा फूटत नाहीत.
मुळात माझा अंतर्मुखी स्वभाव आहे.
पण जेव्हा पासून तू भेटलीस.
तुला सतत भेटण्याची,
तुला सतत पाहण्याची,
तुझ्या सहवासात सतत राहण्याची,
आणि फ़क्त तुझ्याच
"प्रेमाची ओढ़"
मला लागली आहे.
-प्रविण जावळे.
18/07/2015-12.11AM

Comments
Post a Comment