चू साला

चू साला.

चहाच्या घोट घेत
जुन्या मित्राचा हालहवाल जाणून घेण्यासाठी
मी त्याला विचारलं "कसा आहेस?"

सिगरेटच्या धुराची
रिंग बनवतानाचा पॉज घेत तो म्हणाला.
"एकदम मस्त भावा.''

पुढचा घोट पिण्यासाठी चहा ओठी लावत
मी विचारलं.
"ती कशी आहे?"

फिल्टर पायाने तुडवत तो म्हणाला.
"कोणाबद्दल बोलतोय?
जिला दोन वर्षांपूर्वी खाऊन सोडलं ती?
कि, जी माझ्यावर
जीव ओवाळून टाकायला तयार आहे;
म्हणून माझी रोजची सोय करते ती?
परवा जीच्यासोबत ब्रेकअप केलं ती?
कि, जिचं गेल्या आठवड्यात सील तोडलं ती?
किंवा कालच नवीन कटलेली ती?

मी अवाक होत त्याच्याकडे पाहिलं.
तर तो म्हणाला.
"काय झालं मित्रा?'

मी चहाचा शेवटचा घोट घेऊन निघताना म्हणालो.
"मित्र होतो आपण
जेव्हा आपले विचार एक होते."

त्याने हसत-हसत दोन सिगरेट काढून
एक सिगरेट देत मला म्हणाला.
"हे घे...बाकी प्यार-बीर सब चुगिरी है दोस्त।"

"मी नाही पित" बोलून
पाठमोरा होत त्याच्यापासून दूर गेलो
तेव्हा तो मला नक्की म्हणाला असेल.
"चू साला."

-प्रवीण जावळे.

१७/०९/२०१७
०४.३४

Comments

Popular posts from this blog

सभ्य बलात्कार

भणंग रस्ते - कविता

नास्तिकाचं घर