निघून जाण्याआधी...
निघून जाण्याआधी.. . सौरभशी बोलावसं वाटतं. पण त्याने अबोला धरला आहे. जेव्हा मी त्याच्याशी बोलायला जाते तेव्हा मात्र तो दुर्लक्ष करून माझ्यापासून दूर निघून जातो. त्याच्या अश्या वागण्याचा मला त्रास होतोय हे त्याला का जाणवत नाही? अगोदर तर मला भेटण्यासाठी नेहमी उत्सुक असायचा. माझ्यासोबत कॉलेज कॅन्टीनमध्ये मनभरून गप्पा मारत बसायचा. आम्ही अनेक गोष्टी एकमेकांशी शेअर करायचो. खूप काही बोलायचो; पण आता त्याचं मला टाळणं, माझ्यापासून दूर जाणं, माझ्या मेसेजला रिप्लाय न देणं, कॉल अटेंड न करणं, या सगळ्याचा मला फार त्रास होतोय याची त्याला काहीच जाणीव नाही. हे असं का? मी त्याच्या वाढदिवसाला जे वागले ते बरोबर होतं का? हे माझं मलाच कळत नाहीये. माझ्या सान्निध्यात असलेल्या लोकांच्या भावना मला खरच कळतात का? मी त्यांना समजून घेऊ शकते का? हे प्रश्न आता माझं मन खात आहेत. कधी कधी फार अपराधी वाटतं मला. सौरभ माझा अत्यंत जिवलग मित्र. आमच्या दोघांच्या मैत्रीत कसलीच पोकळी राहीलेली नव्हती. विश्वासान...