हा महाराष्ट्र माझा..? कविता

हा महाराष्ट्र माझा..?

समतेने नांदणारी प्रजा
विषमता पेरू लागली.
खोटा इतिहास खरा समजून
आपआपसात भांडू लागली.
लोकशाहीचा धिक्कार करून
खोट्या शिवशाहीचा करती गाजावाजा
खरंच...हा महाराष्ट्र माझा..?

सामान्य सुभेदाराच्या सुनेला
मातेचा दर्जा देणारा राजा.
परस्त्रीला मातेसमान जपणारा
शिवरायांशिवाय राजा नाही दूजा.
पण आता गर्भातच स्त्रीचा खून करून
वंशाच्या दिव्यासाठी करती थोतांडी पूजा
खरंच...हा महाराष्ट्र माझा..?

गरीब-श्रीमंत , उच्च-नीच
जात-पात न मानणारा शिवबा होता.
स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता
प्रजेसाठी प्राण अर्पणारा शिवबा होता.
त्याचा जाणत्या राजाच्या जन्मदिनाचा
दोन तारखेत वाद घालून
करती तिथीप्रमाणे जन्मदिन साजरा
खरंच...हा महाराष्ट्र माझा..?

लोकशाही होती शिवशाहीत
पेराया हवी राजाची लोकशाही.
खरा इतिहास जनमाणसात रुजवून
सांगाया हवी खरी शिवशाही.
मग एकत्र समतेने नांदून
सोडतील जेव्हा स्वार्थ तुझा-माझा
तेव्हा खरंच म्हणेन हा महाराष्ट्र माझा.

- प्रवीण जावळे.

Comments

Popular posts from this blog

सभ्य बलात्कार

भणंग रस्ते - कविता

नास्तिकाचं घर