डॉ. बाबासाहेब आंबेडकर
स्वाभिमानाने जगायला शिकवणारा,
मोठे ध्येय ठेवून झटायला शिकवणारा, कष्ट करण्यास मागे पुढे न पाहणारा,
जिद्दिने लढायला शिकवणारा,
'माणूस म्हणून जगा आणि माणूस म्हणून जगूद्या' बुध्दांचे मानवतावादी तत्वज्ञान पुनर्जीवित करणारा...
मरेपर्यंत शिकणारा विद्यार्थी...
हिंदू धर्माचा धर्मसुधारक...
ग्रंथप्रेमी...
पाण्याचा हक्कासाठी लढणारा पहिला सत्याग्रही...
स्त्रियांचं स्वातंत्र्य, त्यांच्या समस्या / आणि धार्मिक गुलामगिरीतून मुक्त करणारा...
सर्वाधिक शिक्षण घेतलेला उच्चशिक्षित...
कामगाराच्या पिळवणुकीविरुद्ध लढणारा...
निर्भिड पत्रकारिता करणारा आदर्श पत्रकार...
जागतिक पातळीचा अर्थतज्ञ...
स्वातंत्र्यानंतर मुर्दाड भारतात जीव रोवणारा देणारा संविधान निर्माता...
देशभक्त...
कायदेपंडित...
सामूहिक शेतीचा फायदा सांगणारा...
नद्या जोड प्रकल्प, भाक्रा-नांगल प्रकल्प निर्माता...
'दारू पिणे' ही सामाजिक समस्या (व्यसनधीनता) निर्माण होऊ नये यासाठी उपाय करणारा...
इंग्रजांच्या आर्थिक पिळवणुकीच्या कारभाराविरोधात बोलणारा एकमेव भारतीय...
सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक समानता प्रस्थापित करण्यासाठी सर्व मागास जाती-धर्माना आरक्षणाची तरतूद करणारा...
लेखनीपुढे शस्त्राची ताकद फोल असते हे सांगणारा क्रांतिकारक...
लोकशाहीत प्रत्येकाला समान वाटा म्हणजेच प्रत्येकाला मतदानाचा हक्क देणारा...
समाजपरीवर्तनाची शिकवण देणारा
असा जागतिक किर्तीचा प्रतिभावंत महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंत्तीनिमित्त त्यांच्या विचारांवर चालणाऱ्या जगातील सर्व अनुयायांना सुभेच्छा.
-प्रवीण जावळे.
Comments
Post a Comment