Posts

कमिटमेंट

          तो मला माणूस म्हणून भावला होता. खरंच प्रेमात जात,पंथ,धर्म,वंश,रंग हे सगळे भेद त्याला अमान्य होते. आणि हे मला त्यानेच पटवून दिलं होतं. पटवून दिल्यानंतर "मी बोलतोय हे सगळं अगदी बरोबर असेल असं नाही तुझ्या अंतर्मनाला पटलं तर नक्की विचार कर." म्हणजे सगळं सांगून झालं तरी माझं म्हणणं म्हणजे सगळं खरं आहे हे ठणकावून न सांगता उदारमताने विचार व्यक्त करणं फार भावलं होतं. तसेच वरून इतका रुक्ष वाटणारा आणि जहाल विचार करणारा हा इतका रोमँटिक असेल याची कल्पनाच नव्हती. कवितांची डायरी त्याला न सांगता चाळली तर त्याच्या सगळ्या कविता या त्याच्याच आहेत का हा प्रश्न पडला? कवितेतली त्याची प्रियसी अन् तिच्याभोवती घुटमळणाऱ्या याच्या रोमॅंटिसीजमच्या काव्यपंती हे विशेष लक्षण. याच इतकं हळवं मन असू शकेल असं वाटलं नव्हतं. हा नसला तरी याच्यातल्या कवीचं मन हळवं आहे हे नक्की. "फार रोमॅंटिक आहेस रे तू तर!" त्याची खोड काढत म्हटलं.         "म्हणजे?" "ये सब कविताए कह रही है जनाब." त्याची डायरी त्याच्या हाती ठेवत म्हटलं.  ...

तिची इच्छा _ डायरी नोट

शेवटचं बोलणं होतं आमचं. यानंतर पुन्हा कधी भेट होईल(?) सांगता येत नाही. इतक्या दिवसाचे सोबती होतो आम्ही पण खरंच आम्ही एकमेकांचे सोबती होतो का? हा प्रश्न आज स्पष्ट झाला होता. म...

नास्तिकाचं घर

नास्तिकाचं घर हळुवारपणे त्याने तिच्या डोळ्यांवर हात ठेवला अन् दोघांनी घराचा उंबरठा ओलांडला तिच्या डोळ्यांवरील हात बाजूला बाजूला झाल्यावर तिला दिसला प्रशस्त हॉल, आ...

एकतर्फी प्रेम

एकतर्फी प्रेम तो आहे तसाच आहे अजूनही. इतक्या वर्षात बदल अपेक्षित होता पण नाही तसाच आहे तो जसा  पहिल्यांदा मला जाणवला होता. इतरांना स्वतःपेक्षा जास्त महत्त्व देणारा; काम...

कॉफी आणि ती

कॉफी आणि 'ती'          "मी सगळ्यांपासून अलिप्त राहायला पाहतेय तर पुन्हा सगळं आठवतंय. जेवढा दूर जाण्याचा प्रयत्न करतेय तेवढा अधिक त्रास होतोय. काल अचानक त्याने हाक मारली. मला वळून पाहायचं नव्हतं पण पहिल्या हाकेत तो परिचयाचा वाटला नाही मला. तशी तेवढी जवळीक नव्हती त्याची आणि माझी. रेल्वेस्टेशनवरील इतक्या गर्दीत त्याने मला ओळखलं होतं. मी त्याच्याकडे पाहून नजर चोरून निघून जात होते. पण तेवढ्यावर तो थांबला नाही. त्याची पावले गर्दीतील माणसांना धक्के देत माझ्याकडे येत होती. मी मात्र त्याच्यापासून जेवढं दूर जाता येईल तेवढं दूर जात होते. परंतु दोष काय आहे त्याचा तरी? का टाळतेय मी त्याला? अन् त्यालाही जसं काहीच माहीत नाही तसं वागतोय. मी थांबायला हवं होतं का त्यावेळी? खूप दिवसांनी आमची गाठभेट झाली असती पण मी ठरवलं होतं त्याच्यासहित सगळ्यांपासून दूर राहायचं आणि जरी सोबत राहिले असते तर त्यांनी मला स्वीकारलं असतं का? सगळ्यांच्या नजरा मी घोर कृत्य केलंय अश्याप्रकारे दिसल्या असत्या. खरंतर माझं धाडसही होत नाही त्यांना सामोरं जाण्याचं. पण हा तर...म्हणजे मला पाह...

तिला माझी गरज होती?

तिला माझी गरज होती?        दुपारची वेळ. वेस्टर्न लाईनने प्रवास करताना या वेळेत कधी तुडुंब गर्दीत प्रवास केला नाही. अजूनतरी; कारण क्वचितच या लाईनने प्रवास करण्याचं निमित्...

प्रेमात पडताना

प्रेमात पडताना...प्रेम जगताना       प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं तुमचं आणि आमचं अगदी सेम असतं        कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या या छोट्याश्या काव्यपंक्ती प...