तिला माझी गरज होती?

तिला माझी गरज होती?

       दुपारची वेळ. वेस्टर्न लाईनने प्रवास करताना या वेळेत कधी तुडुंब गर्दीत प्रवास केला नाही. अजूनतरी; कारण क्वचितच या लाईनने प्रवास करण्याचं निमित्त ठरतं. बसण्यासाठी पुरेशी जागा मिळाली म्हणून मी निचिंत होतो. आजूबाजूला एक दांपत्य बसलेले. सणवार असल्याने एकंदरीत संपूर्ण परिवार नटून निघाले होते. समोरच्या सीटवर एक तरुणी. वाईट टी-शर्ट आणि ब्लॅक पँटचा पेहराव करून बसलेली. मान खाली. डोक्यावर हात.  मी मोबाईल काढून डेली हंटवरील बातम्या चाळत होतो.

       दोनेक स्टेशन निघून गेलेत हे अनाऊन्समेंटवरून समजत होतं. तीची नजर ट्रेनमधल्या प्रवाशांकडे फिरत होती. आतून काही तरी बिनसलं आहे आहे, कसला तरी शोध घेत आहे, मनात काहीतरी चलबिचल चालू आहे तिच्या चेहऱ्यावरून स्पष्ट जाणवत होतं.

        अचानक तिची आणि माझी नजरानजर झाली. तिने माझ्यावर नजर रोखून ठेवली. पण का न जाणे तिच्या नजरेत पाहण्याचं मला धाडस होत नव्हतं. मी तिची नजर चोरून मोबाईलमध्ये डोळे खुपसून बसलो. विचारांचं काहूर माजलं होतं. काही झालं असेल हिला? इतकी अस्वस्थ का दिसत आहे ही? आपण विचारावं का की, काय झालंय? पण असं विचारानं योग्य की अयोग्य? आणि जर विचारलं तर ती सांगेल का सगळं काही? कदाचित असं वागून मी तिच्या मोकळीकतेमध्ये आडकाठी तर निर्माण करणार नाही ना?

       मोबाईल स्क्रीनवर बोटे स्क्रोल करत होतो निरर्थकपणे. माझ्या डोक्यात मात्र वेगळंच चालु होतं, कृती एक आणि विचार एक. पुन्हा तिच्याकडे पाहिलं तर तिची तिने नजर माझ्यावरच रोखून ठेवली होती. मी पुन्हा तोच चोरटेपणा केला.

       पुढचं स्टेशनला मला उतरावे लागल्याने मी उतरण्याच्या तयारीत. काही अंतरावर स्टेशन. तिला पाठमोरं पाहत असताना मन वळत नव्हतं उतरण्यासाठी. कोणी आपल्या ओळखीचं असलं असतं तर असच त्याच्या परिस्थितीवर टाकून निघून गेलो असतो का? नक्कीच त्याचं सांत्वन केलं असतं. करता आलं असतं की नाही ते माहीत नाही पण असं तर नक्कीच वागलो नसतो.

     उतरण्याची सगळ्याची लगबग सुरू असताना अचानक दोन पावलं तिच्याकडे वळली. तिच्या खांद्यावर हात ठेवला. तिने मागे पाहिलं. पापण्या निक्षून गेल्या होत्या. डोळ्यात ओलसरपणा होता तिच्या.

  "डोन्ट वरी. होईल सगळं व्यवस्थित. बी हॅपी" मी आश्वासकतेने बोलून तसाच निघून गेलो.

उतरल्यावर "एस्क्यूज मी" तिने दोनेक वेळा तिने आवाज दिला असेल तिच्या आवाजाच्या तीव्रतेवरून कळलं. तेव्हा तिच्या चेहऱ्यावर ओघळ हास्य होतं. परंतु तेव्हा ट्रेनने वेग पकडला होता.

Comments

  1. Mi asto tr kadachit anolkhi vyakti samor khandyavar hat theun bolnyacha dhadas kela nasta.... Baki story.. Chan ahe.

    ReplyDelete
  2. होतं असं माझ्यासोबतही.. कधी बोलते, तर कधी नाही होत धाडस अनोळखी लोकांशी बोलण्याचं..

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

सभ्य बलात्कार

भणंग रस्ते - कविता

नास्तिकाचं घर