कॉफी आणि 'ती' "मी सगळ्यांपासून अलिप्त राहायला पाहतेय तर पुन्हा सगळं आठवतंय. जेवढा दूर जाण्याचा प्रयत्न करतेय तेवढा अधिक त्रास होतोय. काल अचानक त्याने हाक मारली. मला वळून पाहायचं नव्हतं पण पहिल्या हाकेत तो परिचयाचा वाटला नाही मला. तशी तेवढी जवळीक नव्हती त्याची आणि माझी. रेल्वेस्टेशनवरील इतक्या गर्दीत त्याने मला ओळखलं होतं. मी त्याच्याकडे पाहून नजर चोरून निघून जात होते. पण तेवढ्यावर तो थांबला नाही. त्याची पावले गर्दीतील माणसांना धक्के देत माझ्याकडे येत होती. मी मात्र त्याच्यापासून जेवढं दूर जाता येईल तेवढं दूर जात होते. परंतु दोष काय आहे त्याचा तरी? का टाळतेय मी त्याला? अन् त्यालाही जसं काहीच माहीत नाही तसं वागतोय. मी थांबायला हवं होतं का त्यावेळी? खूप दिवसांनी आमची गाठभेट झाली असती पण मी ठरवलं होतं त्याच्यासहित सगळ्यांपासून दूर राहायचं आणि जरी सोबत राहिले असते तर त्यांनी मला स्वीकारलं असतं का? सगळ्यांच्या नजरा मी घोर कृत्य केलंय अश्याप्रकारे दिसल्या असत्या. खरंतर माझं धाडसही होत नाही त्यांना सामोरं जाण्याचं. पण हा तर...म्हणजे मला पाह...