हि आणि 'ती'

      निष्पर्ण झालेल्या रोपट्याला पाण्याचा सहवास लाभून त्याला नवचेतना मिळावी तसं काहीसं माझ्या बाबतीत झालं. गर्तेत ढकलला गेलेला भूतकाळाची ओढ आज लागली होती.

     कितीतरी वेळ मी तिला निरखून पाहत होतो. एका क्षणाला हिला पाहून वाटलं की ही 'तीच' आहे पण ही 'ती' नव्हती. हिच्यामध्ये आणि 'तिच्यामध्ये' बरचसं साम्य होतं. गोल चेहरा, बारीक पण बोलके डोळे अन् त्या डोळ्यात हसताना दिसणारा पाणेरी ओलावा. साधे एका वेणीत गुंफलेले लांब केस. फार अबोल आणि लाजरी अशी हि. स्पष्ट आणि नेमक्याच शब्दात समोरच्याला सांगणं 'तिच्याप्रमाणे' हिलाही उत्तमप्रमाणे जमलं होतं. माझ्याशी दोनच शब्द बोलली आणि हे हिचे बोल कानाला मधुर वाटले होते.

     हिच्या येण्याने मन अगदी प्रफुल्लित झालं होतं. सतत हिला पाहत राहावं असं वाटू लागलं होतं कारण ही जणू 'तीचं' प्रतिरुपच आहे असं वाटत होतं. हि जोवर नजरेसमोर होती तोवर मी माझ्या धुंदीत मनोमन खुश. हिच्या येण्याने नकळत 'ती' जवळ असल्याचा भास झाला. अखेर हिला जात असताना पाहून का न जाणे पण काहीतरी रितेपन निर्माण झाल्यासारखं वाटलं. परत हि येईल की नाही माहित नाही पण प्लिज ये पुन्हा तू...आणि मनपूर्वक आभार तुझे.

डायरी नोट (१५/०५/१८)
http://pravinbjawale.blogspot.in

Comments

Popular posts from this blog

सभ्य बलात्कार

भणंग रस्ते - कविता

नास्तिकाचं घर