Posts

'आय लव्ह यू' बोलण्याचा खरा आनंद. ललित लेख

आय लव्ह यू' बोलण्याचा खरा आनंद.   खरा आनंद   हा आपल्याला मिळालेल्या आनंदात नसून; आपण दुसऱ्यांना दिलेल्या आनंदात असतो. माझ्या या मताबाबत मी निश्चित ठाम आहे, कारण आजवर मला आलेल्या वैयक्तिक अनुभवामुळे मी हे सांगू शकतो. मात्र याबाबत इतरांचं काय मत असेल? हे मी सांगू शकत नाही. वर्षभरात अनेक घटना अवती-भवती घडल्या आणि त्यात नवीन असं काही नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात कित्येक घटना घडतच असतात. पण घटनांचं गांभीर्य आपल्याला ओळखता आलं पाहिजे व त्या घटनांतून चांगल्या-वाईट गोष्टी ओळखून शिकता आल्या पाहिजेत. यासंदर्भातली एक घटना माझ्यासोबत नेहमी घडत असते आणि ती घटना प्रत्येकजण अनुभवत असणार...हे नक्की..! तर ती घटना अशी...कॉलेज मधले सगळे लेक्चर्स झाल्यावर तिची आणि माझी भेट दररोज नित्यनियमाने व्हायची. मग त्या भेटीत रोमॅंटिक गप्पा मारत टिफिन किंवा कॅन्टिंगमधली फ्रैंकी, चायनीज भेळ, वडापाव खाण्याचा आमचा बेत ठरलेला असायचा. या दररोजच्या भेटीत नवीन असं काही नसे, यामुळे आज...म्हणजे त्या दिवशी जरा नाविण्य घडावं म्हणून कॉलेजबाहेर जाऊन वडापाव खाण्याचं ठरवलं. कॉलेजपासून ५ ते ७ मिनिटे अंतरावर...

गैरसमज

माणसाने मनात आलेले सगळे संशय बोलून दाखवावेत. ते मनात तसेच ठेवले की गैरसमज तयार होतात.

वेगळं मातृत्वाचं नातं - कविता

वेगळं मातृत्वाचं नातं तशी तुझी अन् माझी ओळखदेख बिलकुल नाहीये. एका विलक्षण नात्याच्या संगतिने तुझ्या अन् माझ्या नात्याची पायमुळं रोवलीहेत. ममत्वाचं नातं जोडलंय मी तु...

आधार शब्दांचा - कविता

Image
शब्दांच्या दुनियेत वावरताना विपर्यास गेलेले शब्द राहिले नाहीत नजरेसमोर काही शब्द नजर चुकवून मला टाळत होते काही शब्द आवर घालून मला दिलासा देत होते पण काही शब्द तर जवळ...

निष्ठुरतेची फ्रेम. कविता

निष्ठुरतेची फ्रेम आठवणींच्या वहीतल्या कागदाचा अन् पेनातल्या शाईचा अट्टहास न करता लिहावं म्हणतोय, रंगवावीशी वाटतायेत थंडीत गोठलेली गात्रे. प्रखर थंडीत गुरफटत असाय...